Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 13th, 2020

  इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन व उपकरणांची दुकाने सुरू करावीत

  नागपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे बंद झालेली इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन व इतर उपकरणांची दुकाने पुन्हा सुरू करण्याची मागणी नागपूर इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनने मनपा आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

  असोसिएशनचे अध्यक्ष ए.के. गांधी म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने सुरू करून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नागपुरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सर्वाधिक दुकाने आहेत. या सर्व दुकान आणि शोरूमच्या संचालकांना आर्थिक फटका बसत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीस तापमान ४८ डिग्रीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपुरात परिस्थिती असह्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात एअर कंडिशनर्स आणि एअर कुलरची जास्त आवश्यकता आहे. मुंबई आणि पुणे वा राज्यातील इतर शहरांपेक्षा नागपुरात या वस्तूंची जीवनाश्यक वस्तूंप्रमाणेच जास्त आवश्यकता आहे. लॉकडाऊनंतर दुकाने आणि शोरूम बंद झाल्याने या वस्तूंची खरेदी थांबली आहे. दुकाने सुरू केल्यास गरमीच्या दिवसात लोकांची गरज पूर्ण होणार आहे.

  नागपूरची लोकसंख्या ३५ लाखांच्या आसपास आहे. मुंबई आणि पुणेनंतर राज्यांच्या इतर शहरांच्या तुलनेत नागपूरची लोकसंख्या जास्त आहे. त्यानंतरही प्रशासनानने सकारात्मक पावले उचलल्याने नागपुरात कोविड-१९ रुग्णांची संख्या ३०० च्या आसपास आहे. ही नागपूरसाठी चांगली बाब आहे. अनेक गोष्टी नियंत्रणात आहेत.

  वाढत्या गरमीत रहिवाशांना एअर कुलर आणि एअर कंडिशनर्स खरेदी करण्यासाठी शोरूम सुरू करणे गरजेचे आहे. पुणे महानगरपालिकेने ३ मे पासून ठरलेल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल फोन, संगणक, वाहन व हार्डवेअर व प्लम्बिंग स्टोअर्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अशाच प्रकारे दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी तसेच डीलर असोसिएशन सर्व सुरक्षा उपाय व निकषांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करेल, असे असोसिएशनचे अध्यक्ष ए.के. गांधी यांनी म्हटले आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145