Published On : Tue, Sep 17th, 2024
By Nagpur Today Nagpur News

धक्कादायक; नागपुरात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार,पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

Advertisement

नागपूर : पारडी परिसरात रविवारी दुपारी चार वाजता एका ९ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात आरोपीने तिच्या पाच वर्षांच्या बहिणीच्या उपस्थितीत हा गुन्हा केला आणि तिला गप्प राहण्यासाठी 20 रुपये देऊ केले.

घटनेला 24 तास उलटूनही पोलीस आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या प्रकरणावर लक्ष केंद्रित केले आहे

Gold Rate
Feb 17 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,000 /-
Gold 22 KT ₹ 1,43,200 /-
Silver/Kg ₹ 2,40,500 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दोघी बहिणी एकट्या होत्या कारण त्यांचे आई-वडील दोघेही रोजंदारीवर कामावर होते. तीन महिन्यांपूर्वी हे कुटुंब नागपुरात आले होते, असे अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, पीडितेने आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी पारडी पोलिस ठाण्यात धाव घेतली, तेथे पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तपासणीत बलात्काराची पुष्टी झाली.

पाच वर्षाच्या बहिणीच्या माहितीच्या आधारे, आरोपीच्या कपाळावर ‘तिलक’ लावला होता. आरोपी हा मराठी भाषिक असल्याचा संशय पोलिसांना आहे.मुली दिवसभर एकट्या राहतात हे आरोपीला आगोदरच माहिती असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement