Published On : Tue, Nov 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

धक्कादायक; वर्ध्यात पोलिसांपासून वाचवण्यासाठी गोवंशाची तस्करी करणाऱ्या चालकाने ट्रक दिले पेटवून; सहा गुरे दगावली

Advertisement

वर्धा : समृद्धी महामार्गावरील येलाकेली नाक्याजवळ गुरे घेऊन जाणाऱ्या ट्रकला चालकाने आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात 15 जनावरे असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ट्रकचालकाने हे कृत्य केल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, येलाकेली टोलनाक्याजवळून हा ट्रक जात होता. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी ट्रक थांबवण्यासाठी पुढे सरसावले.

मात्र वाहन चालकाने पोलिसांच्या दोन्ही वाहनांना धडक दिली आणि पुढे निघून गेला. दोन पोलिसांच्या वाहनांना धडक देऊन ट्रकचालक मुंबईच्या दिशेने पळत होता.

यानंतर चालकाने पुढे जाऊन विरूळजवळ ट्रकला आग लावून पुलगावच्या दिशेने पळ काढला.दुर्दैवाने ट्रकने पेट घेतल्याने सुमारे पाच ते सहा गुरे दगावल्याची माहिती आहे तर नऊ प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. एलसीबी पथकाच्या वाहनासह सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.