Published On : Thu, Feb 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

धक्कादायक! नागपुरात १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; बारावीच्या विद्यार्थ्यासह तिघांना

Advertisement

नागपूर : शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत बारावीच्या विद्यार्थ्यासह तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी दोघे अल्पवयीन असून सर्वांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, मुख्य आरोपी हा पीडित मुलीच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. ५ फेब्रुवारी रोजी त्याने मुलीला मोबाईलवर संदेश पाठवून घरी बोलावले. घरात इतर कोणी असेल, असा समज करून मुलगी त्याच्या घरी गेली. मात्र, तेथे मुख्य आरोपीसह त्याचे दोन मित्र आधीचउपस्थित होते. तिघांनी मिळून मुलीला घरातील आतल्या खोलीत नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचाराच्या वेळी आरोपींनी व्हिडिओ चित्रित केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, कुणाला सांगितल्यास तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेनंतर मुलगी भीतीमुळे काही दिवस शांत राहिली. मात्र, चार दिवसांनी तिने धैर्य एकवटून संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तातडीने नंदनवन पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून, आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कथित व्हिडिओबाबत तांत्रिक तपास सुरू आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी हा बारावीचा विद्यार्थी असून त्याची परीक्षा सुरू होती. मंगळवारी त्याचा पहिला पेपर होता; मात्र या गुन्ह्यामुळे परीक्षा केंद्रात जाण्याऐवजी त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली. या घटनेचे पडसाद आरोपीच्या कुटुंबावरही उमटले असून, मुलगा गंभीर गुन्ह्यात अडकल्याची माहिती मिळताच त्याच्या वडिलांना धक्का बसून हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges