Published On : Sat, Feb 3rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

धक्कादायक ; भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार !

मुंबई : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे या गोळीबारात जखमी झाले आहेत. अशात गणपत गायकवाड यांनी मी हा गोळीबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे केला असल्याचे स्पष्ट केले.पोलिसांनी याप्रकरणी गणपत गायवाडांसह तिघांना केली.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मला मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मी पाच गोळ्या झाडल्या, मला त्याचा काहीही पश्चात्ताप नाही. माझ्या मुलांना जर मारत असतील पोलीस ठाण्यात तर मग मी काय करणार? पोलिसांनी मला पकडलं म्हणून तो वाचला. पण मी त्यांना जीवे मारणार नव्हतो.

Gold Rate
Wednesday12 Feb. 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मी स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचलले. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत, असेही गायकवाड म्हणाले.

दरम्यान एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि भाजपाबरोबरही ते गद्दारी करणार आहेत.महाराष्ट्र चांगला ठेवायचा असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी विनंती मी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना केल्याचे गायकवाड म्हणाले.

Advertisement