Published On : Tue, Jul 9th, 2024
By Nagpur Today Nagpur News

Video: धक्कादायक; हिंगणा रोड येथील अमर नगर परिसरातील घरात कोब्रा सापाचे तब्बल 14 पिल्ले आढळल्याने खळबळ !

Advertisement

नागपूर : पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी सापाचे दर्शन होत आहे. पण, नागपुरातील हिंगणा रोड येथील अमर नगर परिसरातील एका घरामध्ये एक दोन नव्हे तर 14 कोब्रा साप आढळून आल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील दिलीप यादव यांच्या राहत्या घरी घटना घडली. यादव यांच्या घरातून यांच्या घरात नाग जातीचे 14 पिल्ले कडण्यात सर्प मित्राला यश आले आहे.

घरात साप असल्याचे कळताच यादव यांनी सर्पमित्र आकाश मेश्राम, विकास मेश्राम आणि आदित्य बाळबुदे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र यांना पाचारन करण्यात आले. यादरम्यान शोधमोहिमेत नाग जातीचे 14 विषारी पिल्ले पकडण्यात सर्पमित्रांना यश आले. पिल्यांची संख्या जास्त असु शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार घर मालकाला लक्ष ठेवण्याविषयी सांगण्यात आले आहे. सर्पमित्र यांनी कोब्रा सापाला पकडून जंगल परिसर सोडून दिले. रात्रीची वेळ असल्याने विषारी कोब्राला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. परंतु सर्पमित्र तात्काळ हजर झाल्याने घरच्यानी सुटकेचा श्वास सोडला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.