नागपूर : राज्यामध्ये दिवसाला सरासरी 34 बाळांचा मातेच्या गर्भातच मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर प्रत्येक आठ तासात एक मातामृत्यू होत आहे. माहिती अधिकारामधून ही धक्कादायक माहिती माहितीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तपशिलातून समोर आली आहे.
एकीकडे राज्य सरकारकडून माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. माता आणि बाल माता तसंच बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून विविध स्तरावर उपाय करत असल्याचा दावा केंद्र आणि राज्य शासनाकडून वारंवार केला जातो. मात्र वास्तव्यास तसे चित्र दिसत नाही.
दरम्यान आकडेवारीनुसार, राज्यात 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2023 या काळामध्ये 22 हजार 98 कमी वजनाच्या बाळाचे गर्भातच झालेले मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर 2 हजार 64 मातामृत्यू नोंदवण्यात आले. या आकडेवारीची दिवसाची सरासरी काढल्यास राज्यात सुमारे 34 कमी वजनाच्या बाळाचे मृत्यू तर 3 मातामृत्यू झाले आहेत.राज्यात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान 13 हजार 635 उपजत मृत्यू तर 1 हजार 217 मातामृत्यू नोंदवण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आणलेत. पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण कार्यालय आकडेवारीला दुजोरा दिला आहे.