Advertisement
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांता भाजपवर नाराज होत्या. सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा देताना सांगितले की, गेल्या 10 वर्षात खूप काही शिकले. त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचेही आभारी आहोत.
हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे आपला राग व्यक्त केला होता.