Published On : Tue, Mar 19th, 2024

भाजपला धक्का; २०५ पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राजीनामा, पक्षाच्या उमेदवाराबद्दल नाराजी

Advertisement

जळगाव: लोकसभा निवडणुकीच्या तारखा झाल्या आहेत. भजपाचे लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील उमेदवाराचा सामावेश आहे. मात्र रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याच पक्षातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध केला. रक्षा खडसे भाजपापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या जास्त मदत करतात असा आरोप करत आणि त्यांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध करत वरणगावसह परिसरातील भाजपाच्या २०५ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे पाठविले आहेत. वरणगाव येथील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख व सुपर वॉरियर यांची बैठक रविवारी झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान राजीनामे देणाऱ्या पैकी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, ओबीसी शहराध्यक्ष गोलू राणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष आकाश निमकर, शहराध्यक्ष सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष माला मेढे, शामराव धनगर, महिला शहर अध्यक्ष प्रणिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैंसे, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस डॉ. सादीक शेख, जिल्हा उपाध्यक्ष हाजी फायुम, कायदे आघाडी सरचिटणीस अँड. ए. जी. जंजाळे यांच्यासह २०५ जणांच्या सह्यांचे पत्र जे. पी. नड्डा यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.