मुंबई: लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटाका बसला असून महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत.आता महाविकास आघाडीने विधानसभेसाठी तयारी सुरु केली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे.
यातचउत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत.
उत्तर महाराष्ट्रातून शरद पवार यांनी दोन खासदार निवडून आणल्यानंतर पवार गटाने याठिकाणी वर्चस्व निर्माण केल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 13 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस सध्या मोठा भाऊ ठरला आहे.
मात्र असे असतानाही काँग्रेस पक्षातील एक नाराज आमदार शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती समोर येतं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याने ते दोन आमदार कोण आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





