Published On : Tue, Jun 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अजितदादांना धक्का ;शरद पवारांच्या तुतारीचा आवाज घुमला, महाराष्ट्रात दोन जागांवर आघाडी

Advertisement

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरोधात महायुतीमध्ये स्पर्धा रंगली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटानं दोन जागांवर आघाडी घेतली आहे. बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत तर शिरूरमधून अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत.बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने आले. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सुप्रिया सुळे सध्या बारामतीमधून आघाडीवर आहेत.तर महायुतीच्या सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची बनवली होती, आढाळराव पाटील यांनी ऐनवेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत शिरूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे मैदनात उतरले. या मतदारसंघातून सध्या अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.

दरम्यान देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे.लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीकडून भाजपाने २८, शिवसेना शिंदे गटाने १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ४ आणि रासपने १ जागेवर निवडणूक लढवली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने २१, काँग्रेसने १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने १० जागांवर निवडणूक लढवली होती.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.