Published On : Tue, Jan 7th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात HMPV व्हायरसचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ:13 वर्षांच्या मुलीसह 7 वर्षाचा मुलगा पॉजिटिव्ह !

Advertisement

नागपूर:कर्नाटक आणि गुजरातनंतर महाराष्ट्रातील नागपुरात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चे दोन रुग्ण आढळले आहेत. एक 13 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांच्या मुलाची विषाणूची चाचणी पॉजिटिव्ह आली आहे.

यात रुग्णाला प्रामुख्याने सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे आढळतात. सतत श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असलेल्या या दोन मुलांना नागपुरातील खासगी रुग्णालयात नेले असता ही प्रकरणे उघडकीस आली. 3 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दोन्ही मुलांमध्ये HMPV संसर्गाची पुष्टी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलांवर घरीच उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

श्वासोच्छवासाच्या संसर्गास कारणीभूत ठरणारा विषाणू सामान्यत: लहान मुलांवर परिणाम करतो, परंतु ही प्रकरणे मोठ्या मुलांवरही त्याचा संभाव्य प्रभाव टाकतात. नागपुरातील एचएमपीव्ही प्रकरणांच्या उदयामुळे आरोग्य तज्ञांमध्ये चिंता वाढली आहे, पालकांनी त्यांच्या मुलांमध्ये सतत श्वसनाच्या लक्षणांबद्दल जागृत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.