Published On : Mon, Jul 2nd, 2018

शिवसेनेचे अनिल परब पुन्हा दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर

Advertisement

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार अनिल परब यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्री येथे रविवारी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत ठाकरे यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान होणार संपन्न होणार आहे.

विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे तीन, भाजपाचे दोन आणि शेकापचे एक सदस्य निवृत्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी १६ जुलैला मतदान होणार आहे. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार भाजपाच्या वाट्याला पाच, शिवसेनेकडे दोन आणि आघाडी झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला तीन जागा येऊ शकतात. अकराव्या जागेसाठी मात्र जुळवाजुळव करावी लागणार आहे.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिवसेनेकडे अतिरिक्त मते असल्याने तिसरा उमेदवार देत अकरावी जागा खेचून आणण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत आणणे, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळाली.

दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी अन्य नावांचा विचार यावेळी झाला. शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या नावावरही चर्चा झाली.

Advertisement
Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges