
नागपूर :शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या प्रतीके असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने छत्रपती चौक येथील महाराजांच्या प्रतिमेला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पमालांद्वारे अभिवादन करण्यात आले.
हा कार्यक्रम विधान परिषदेचे आमदार संदीपजी जोशी आणि माजी दक्षिण-पश्चिम विधानसभा अध्यक्ष रितेशजी गावंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. भाजयुमो दक्षिण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष नागेशजी साठवणे यांच्या नेतृत्त्वात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमावेळी भाजप नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी, भाजयुमोच्या प्रदेश महामंत्री शिवानी ताई दाणी, शहर अध्यक्ष बादलजी राऊत, त्रिमूर्ती नगर मंडळ अध्यक्ष ईश्वरजी ढेंगळे, सुभाष नगर मंडळ अध्यक्ष दिलीपजी दिवे, धंतोली मंडळ अध्यक्ष विनोदजी शिंदे, युवा मोर्चा दक्षिण पश्चिम मंडळाचे महामंत्री आशुतोष भगत, तसेच अमन पौणीकर आणि शौनक जहागिरदार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात छत्रपतींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प केला.
प्रेम जाल में फंसाकर नाबालिग छात्रा से दुष्कर्म #nagpurnews #crime #dushkram #accusedarrested
मुंबई में नौकरी, नागपुर में चोरी! #nagpurnews #crime #mumbaichor #accusedarrest #latestnews
बच्चों पर संकट का डर दिखाकर 3 लाख की ठगी ...#updatenews #latestnews...
AI के बढ़ते दौर में साइबर सुरक्षा क्यों है सबसे बड़ी चुनौती?...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 9 JULY 2026 #topnews...
टीईटी और गैर-शैक्षणिक कार्यों का विरोध #maharashtranews #teacher #schoolclosed #andolan #pradarshan




