नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या नगरसेविका शिवानी दानी यांची सोमवारी एकमताने निवड झाली. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने दानी यांची निवड बिनविरोध ठरली.
सभापतीपदासाठी शिवानी दानी यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. सत्ताधारी भाजपकडे स्थायी समितीत ११ सदस्यांचे स्पष्ट बहुमत आहे. काँग्रेसचे चार सदस्य आणि मुस्लिम लीगचा एक सदस्य अशा एकूण १६ सदस्यीय समितीत भाजपची ताकद लक्षात घेता काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.
सभापतीपदासाठी भाजपने यापूर्वीच दानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया औपचारिक ठरणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते.
महानगरपालिकेच्या आर्थिक धोरणांपासून ते प्रशासकीय निर्णयांपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी स्थायी समिती ही मनपातील प्रभावी समिती मानली जाते. त्यामुळे या निवडीकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.
RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत...
संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news...
अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest...
टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews
16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra








