Published On : Mon, Feb 19th, 2018

मनपाद्वारे शिवाजी महाराजांना अभिवादन

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महापौर नंदा जिचकार यांनी गांधी गेट महालस्थित शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेविका नेहा वाघमारे, श्रद्धा पाठक, हर्षदा साबळे, बंटी शेळके, माजी स्थायी समिती सभापती बंडू राऊत, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, मनोज साबळे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डनवीस प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
May 05- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,48,800 /-
Gold 22 KT ₹ 1,38,400 /-
Silver/Kg ₹ 2,47,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील महापौर कक्षातही मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले.

शिवाजी नगर येथील सिंहासनारूढ पुतळ्याला माल्यार्पण

शिवाजी नगर येथील उद्यानात नव्याने बसविण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला महापौर नंदा जिचकार यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी स्थापत्य व समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, रा.स्व.संघाचे बापू भागवत, भारतीय जनता पार्टीचे श्रीकांत देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement