Published On : Wed, May 14th, 2025
By Nagpur Today Nagpur News

शिवसेनेचे ताकदवान नेते सुमुक मिश्रा यांची पक्षाच्या नागपूर शहर कार्याध्यक्षपदी निवड!

Advertisement

नागपूर :शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ उपक्रमाअंतर्गत नागपूरच्या राजकारणात सक्रिय असलेले नेते सुमुक मिश्रा यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांची नागपूर शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

ही नियुक्ती हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन ध्यानात घेऊन करण्यात आली आहे. दिनांक २४ मार्च २०२५ रोजी ही निवड अधिकृतपणे जाहीर झाली असून, या पदाची मुदत एक वर्ष राहणार आहे. शिवसेनेचे सचिव संजय पुष्पलता भाऊसाहेब मोरे यांनी हे पत्र जारी केले आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संघटन विस्तारासाठी कटिबद्ध – सुमुक मिश्रा
शिवसेनेत सामील होताच सुमुक मिश्रा यांनी नागपूरमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, स्थानिक राजकारणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाचे कामकाज अधिक गतीमान होईल, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

उदंड ऊर्जा असलेले नेते-
पूर्वी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे अध्यक्ष असलेले मिश्रा यांनी पक्षवाढीसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कार्य केले होते. ते ‘फायरब्रँड’ नेता म्हणून ओळखले जातात. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणारे, आणि अन्यायाविरोधात उघडपणे भूमिका घेणारे मिश्रा हे नागपूर विद्यापीठाच्या आंदोलनातही आघाडीवर होते. त्यांनी एकदा कुलगुरुंच्या खुर्चीवर ठाण मांडून निषेध नोंदवला होता.

शक्ती कपूर यांच्यावर कारवाई करून चर्चेत
कास्टिंग काऊच प्रकरणात त्यांनी ठाम भूमिका घेत ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांना काळे फासून निषेध केला होता. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. मिश्रा हे महिला शोषणाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे नेते म्हणून परिचित आहेत.

शिवसेनेचा झेंडा बुलंद करणार – मिश्रा
नवीन जबाबदारीबद्दल प्रतिक्रिया देताना मिश्रा म्हणाले, “शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर जनतेसाठी लढणारी चळवळ आहे. नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहराची धुरा माझ्यावर सोपवण्यात आली याचा मला अभिमान आहे. मी प्रामाणिकपणे, चिकाटीने आणि शिवसैनिकांच्या सहकार्याने नागपूरमध्ये शिवसेनेचा झेंडा अभिमानाने फडकवेन.”

Advertisement
Advertisement
Advertisement