Published On : Tue, Apr 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

वणीत शिवसेनेचा आक्रोश; खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याविरोधात निषेधाचा ज्वालामुखी

Advertisement

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आक्रमक आंदोलनाने दणाणून गेले. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या अलीकडील वक्तव्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला.

या आंदोलनाचे नेतृत्व वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तर वणी विधानसभा प्रमुख साकेत अविनाश भुजबलराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मोर्चात शहर प्रमुख विनोद ढुमणे, उपशहर प्रमुख राजू पाटील, समीर लेंगुळे, प्रकाश कराड, मोरेश्वर, नगरसेवक सुधीर थिरे, अनिकेत बदकल, अजय ढोबे, शत्रुघन मालेकर, गुलाब आवारी यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान उपस्थितांनी एकमुखाने इशारा दिला की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का देणारे कोणतेही वक्तव्य सहन केले जाणार नाही. अशा प्रवृत्तीविरोधात भविष्यात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट संदेश शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.