Published On : Wed, Sep 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

ठाण्यात शिवसेना UBT नेत्याची हत्या; विरोधकांकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर सवाल

Advertisement

ठाण्यात शिवसेना UBT नेत्याची हत्या; विरोधकांकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर सवाल

मुंबई : ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळीबारात हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. मंगळवारी रात्री मानपाडा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

या घटनेनंतर शिवसेना UBTचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी राज्यातील गुन्हेगारी घटनांवरून सरकारवर टीका केली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह विविध शहरांमध्ये गुन्हेगारीच्या घटना घडत असून आरोपींमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पूर्णेकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही या हत्येनंतर कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. सरकारच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेल्याचा दावा करत त्यांनी राज्यातील चोरी, लूटमार आणि गोळीबाराच्या घटनांचा उल्लेख केला. तसेच नागपूरच्या बेलतरोडी परिसरातील एका घटनेचाही संदर्भ त्यांनी दिला.

दरम्यान, पोलिसांकडून हत्येमागील कारणाचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात राजकीय वैमनस्यासह वैयक्तिक कारणांच्या शक्यताही तपासल्या जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.