मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहे.आता शिवसेना ठाकरे गटाकडूनही लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली.
सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर ठाण्यातून राजन विचारेंना संधी देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी एक्स वर यादी पोस्ट करत लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत.
दरम्यान ठाकरे गटाकडून चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या १७ उमेदवारांची नावे-
१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम
३) संजोग वाघेरे पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टिकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाऊ वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी )
१२) राजन विचारे-ठाणे
१३) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य
१४) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य
१५) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण
१६) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य
१७) संजय जाधव-परभणी