
नागपूर – शहरात ओव्हरलोड वाहनांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते नितिन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली RTO कार्यालयाचा जोरदार घेराव करण्यात आला. या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, शहरात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असून यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. तसेच शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
नितिन तिवारी यांनी RTO अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला. पोलिसांकडून रेत माफियांवर मकोका अंतर्गत कारवाई होत असताना RTO विभाग मात्र निष्क्रिय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला असून, लवकरात लवकर व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.








