Published On : Fri, Dec 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

शिवसेना अपात्र आमदार निकालासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ : सुप्रीम कोर्ट

Advertisement

नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात दाखल याचिकांवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.राहुल नार्वेकर यांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली.

विधानसभा अध्यक्ष २८ डिसेंबर पर्यंत सुनावणी पूर्ण करणार आहेत. मात्र यावर निकाल देण्यासाठी त्यांना काही वेळ हवा. २ लाख ७१ हजार पानांचे सबमिशन असल्यामुळे लगेच निकाल देणं शक्य नाही. यासाठी वेळ वाढवून द्यावा, असे ते म्हणाले.

Gold Rate
02 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,200/-
Gold 22 KT ₹ 1,40,600 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ठाकरे गटाचे वकील यांनी कपिल सिब्बल यांचा आक्षेप –
ठाकरे गटाचे वकील यांनी कपिल सिब्बल यांनी यावर आक्षेप घेतला. गेल्या वेळीही अशीच मुदतवाढ मागितली होती, असं ते म्हणाले. यावर, विधानसभा अध्यक्षांनी वाजवी मुदतवाढ मागितली आहे. २० डिसेंबर रोजी निकाल राखून ठेवला जाईल. याला आणखी वेळ लागणार नाही”, असं तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले . यानंतर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देण्यासाठी १० जानेवारीपर्यंतची वेळ वाढवून दिली.

दरम्यान गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय घेण्यासंदर्भात फटकारले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर अनुक्रमे ३१ डिसेंबर २०२३ आणि ३१ जानेवारी २०२४ पर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच या प्रकरणी निकाल देण्यास दिरंगाई केल्यामुळे न्यायालयाने नाराजी देखील व्यक्त केली होती. आता यावर १० जानेवारी रोजी अंतिम निर्णय येणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement