Published On : Wed, Aug 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरचे शिवसैनिक उद्धव ठाकरेंशी नाराज; भाजप कार्यकर्त्यांवर टीका कारण्यापूर्वी आमच्या व्यथा पाहा !

Advertisement

नागपूर : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप कार्यकर्त्यांवर सडकून टीका केली.भाजपचा मुख्य कार्यकर्ता सतरंजी उचलतो, असे ठाकरे म्हणाले होते. ठाकरे यांच्या विधानानंतर स्वतः व्यथा मांडत नागपुरातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.

नागपुरातही शिवसैनिकांची अवस्था दयनीय आहे. निष्ठावान शिवसैनिक घरी बसला आहे. त्यांची काम करण्याची इच्छा असली तरी बाहेरून आलेले आणि मुंबईतील नेते मंडळी शिवसैनिकांचा अवमान करतात, याकडे केव्हा लक्ष द्याल, असा सवाल दक्षिण नागपूरचे विभागीय संघटक राजेश कनोजिया यांनी केला.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील निष्ठावान शिवसैनिक एकटा पडला. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष बळकट करण्यासाठी कुठलेच कार्यक्रम, नियोजन नाही, असे कनोजिया म्हणाले. नागपूर शहरातील शिवसैनिकांचा आवाज दबला गेला आहे. मुंबईचे नेते आले की बैठक होते. त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते , असे कनोजिया म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement