Published On : Sun, Oct 3rd, 2021
By Nagpur Today Nagpur News

अध्यक्षपदी शिरीष बोरकर सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी.

Advertisement

– नागपूर श्रमिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर,अध्यक्षपदी शिरीष बोरकर सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी.

नागपूर: – नागपूर श्रमिक पत्रकार संघाची निवडणूक दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली या कार्यकारिणीची अविरोध नियुक्ती करण्यात आली नव्या कार्यकारी चा कार्यकाळ हा

2021 ते 2023 असा राहील.

या कार्यकारिणीत अध्यक्ष – शिरीष बोरकर (हितवाद), उपाध्यक्ष – अनंत मुळे (तरुण भारत), परितोष प्रामाणिक (हितवाद), सरचिटणीस – ब्रह्माशंकर त्रिपाठी (लोकमत टाइम्स), कोषाध्यक्ष – वर्षा बाशू (लोकमत), संघठन सचिव – सुरेश कनोजिया (लोकमत समाचार) संयुक्त सचिव महेश उपदेव (सामना) संयुक्त सचिव अभिषेक तिवारी (नवभारत )

Advertisement

कार्यकारिणी सदस्य –
अनुपम सोनी (हितवाद), राजेंद्र उट्टलवार ( देशोन्नती), पराग जोशी (तरुण भारत), सुनील सोनी (लोकमत समाचार), हितेश लिंबाचीया (हितवाद), बसंतकुमार तिवारी (लोकमत समाचार), वर्षा मदने (लोकमत), मीरा टोळे (तरुण भारत ), निखील दिक्षित (हितवाद) यांचा समावेश आहे .

शिरीष बोरकर यांनी यापुर्वी पत्रकार संघाचे अध्यक्षपद ८ वेळा भूषविले असून त्यांनी ५ वेळेस सरचिटणीस पदांचा कार्यभारही सांभाळला आहे. तसेच ते महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस (नागपूर) आहेत. ब्रह्मशंकर त्रिपाठी यांनी नागपूर श्रमिक पत्रकार संघात सरचिटणीस पदाची जबाबदारी चार वेळेस सांभाळलेली असून ते नागपुर प्रेस क्लबचे सरचिटणीस व टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत. ज्येष्ठ पत्रकार रमेश मारुळकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारीपदाची तर वरिष्ठ पत्रकार मिलिंद पाटणकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारीपदांची जबाबदारी सांभाळली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.