Published On : Sat, Nov 16th, 2019

एनसीपी मध्ये शिंदे,नागराळकर यांची पदोन्नति

– प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्ती पत्र

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी आणि नवी मुंबई शहर जिल्हा प्रभारी पदी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शशिकांत शिंदे यांची तर फ्रंटल व सेलच्या राज्य समन्वयकपदी बसवराज पाटील नागराळकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली आहे.

मार्च, एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेवून निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणा राबवावी आणि पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने, तसेच पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शशिकांत शिंदे व बसवराज पाटील नागराळकर हे सहकार्य करतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, समन्वयक बसवराज पाटील नागराळकर उपस्थित होते.