Published On : Fri, Nov 14th, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘शिक्षा प्लस’ कौशल्यविकास उपक्रमाचा नूतन भारत विद्यालयात शुभारंभ

Advertisement

नागपूर : भारतीय विद्या प्रसारक संस्‍थेच्‍या नुतन भारत विद्यालयात हेल्पलिंक चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शिक्षा प्लस’ या कौशल्याधारित उपक्रमाचा शुक्रवारी शुभारंभ करण्‍यात आला.

शिक्षण विभाग (माध्यमिक), नागपूरचे अधीक्षक प्रमोद नाट यांच्या हस्ते डिजिटल क्‍लासरूमचे फित कापून उद्घाटन करण्‍यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोळवलकर गुरुजी स्कूल पुणेचे संचालक मिलिंद कांबळे, हेल्पलिंक चॅरिटेबल फाउंडेशनचे संस्थापक अनिल बाफना यांच्‍यासह करिअर काउन्सेलर संजय कुलकर्णी, भारतीय विद्या प्रसारक संस्‍थेचे सचिव रमेश बक्षी, नूतन भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. वंदना बडवाईक, संस्थापक हेमंत लोढा, प्रभा लोढा, कीर्ती कल्याणी आणि सलोनी बागवान यांची उपस्थिती होती. रवींद्र लष्करे, राजू मुक्केवार, सुनील खानखोजे, गाडगे सर, राहुल पेठे आणि नचिकेत दादा देखील यावेळी उपस्थित होते. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी “शिक्षा प्लस – अ स्किल बेस्ड इनिशिएटिव्ह” या अभ्‍यासक्रम पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सोबतच गोळवलकर इंटरनॅशनल एआय स्कूल या संकल्पनेचेही अनावरण करण्यात आले. हेल्पलिंक फाऊंडेशनतर्फे नूतन भारत विद्यालयामध्ये स्‍पोकन इंग्रजीचे वर्ग घेतले जाणार आहेत.

“केवळ विषयांचे ज्ञान नव्हे तर जबाबदारी, स्वच्छता, मातृभाषेचे ज्ञान, नवीन भाषा शिकणे आणि सामाजिक जाणिवा या छोट्या गोष्टींतून देशप्रेम व्यक्त होते” असे संजय कुलकर्णी म्हणाले. तर प्रमोद नाट यांनी चांगले नागरिक घडविण्यात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असून हीच मुले भविष्यात देश घडवतील, असे उद्गार काढले. मुख्याध्यापिका डॉ. बडवाईक यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली.

Gold Rate
14 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,26,000 /-
Gold 22 KT ₹ 1,17,200 /-
Silver/Kg ₹ 1,62,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘शिक्षा प्लस’ उपक्रमांतर्गत इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्ये, व्यावहारिक ज्ञान यांवर आधारित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल बाफना यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ.अश्विनी देशमुख यांनी केले.

Advertisement
Advertisement