गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे संघटना मजबूत करण्यासाठी मैदानात उतरले आहे. पवार आता अजित पवार यांना पाठिंबा दिलेल्या प्रफुल्ल पटेल यांचा बाल्लेकिल्ला पिंजून काढणार आहेत.
गोंदिया मध्ये येत्या शुक्रवार २८ जुलै रोजी शरद पवार गटाचा मेळावा कशिश सभागृह येथे होणार आहे. या मेळाव्यासाठी कार्यकर्त्ते तयारीला लागले आहे. या मेळाव्याला शरद पवार गटाचे कोणते नेते उपस्थित राहणार आहेत, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण सध्या गोंदियात शरद पवार गटाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संगठन सचिव वीरेंद्र जायस्वाल हे करत आहेत.
२८ जुलै ला गोंदियामध्ये होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात येईल, या मेळाव्यात कोणते नेते सहभागी होणार आहेत, याबाबत लवकरच माहिती दिली जाईल. मेळाव्यानंतर सायंकाळी शरद पवार प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.