Published On : Tue, Feb 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शरद पवारांच्या नातीचा विवाह ठरला; सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती नागपूरची सून होणार

उद्योजक सारंग लखानी कोण?
Advertisement

मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्ष व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नात रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाला आहे. रेवती सुळे यांचा विवाह नागपूरचे उद्योजक सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार असून, त्यामुळे सुळे–पवार कुटुंबाचा नागपूरच्या नामवंत व्यावसायिक कुटुंबाशी स्नेहबंध जुळणार आहे.

या आनंदाची बातमी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. त्यांनी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा एकत्र फोटो शेअर करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या, तसेच सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचेही अभिनंदन केले. ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सारंग लखानी हे नागपूरचे रहिवासी असून, प्रसिद्ध उद्योजक व विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याचंही सांगितलं जात आहे.

होणारे जावई सारंग लखानी कोण?
सारंग लखानी हे उद्योजक असून क्रीडाक्षेत्राचीही त्यांना विशेष आवड आहे. ते एक कुशल बॅडमिंटनपटू असल्याचं समजत असून, त्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. उद्योग आणि क्रीडा अशा दोन्ही क्षेत्रांत त्यांची ओळख आहे.

Advertisement

रेवती सुळे यांची ओळख-
रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या आहेत. त्या शरद पवार यांच्या नात असून, त्यांना विजय सुळे हा भाऊ आहे. रेवती सुळे यांनी London School of Economics येथून उच्च शिक्षण घेतले आहे. अलीकडेच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रथमच सक्रियपणे आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता.

रेवती–सारंग यांच्या विवाहाची बातमी समोर येताच राजकीय, सामाजिक आणि उद्योगजगतातून सुळे व पवार कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, हा विवाह महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.