Published On : Mon, Mar 11th, 2019

माढा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही-शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार लोकसभा संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. कुटुंबातही मी चर्चा केली. मी स्वतः उभं न राहता पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील. नव्या पिढीला संधी द्यावी हा माझा मानस आहे.

एका निवडणुकीला एकाच कुटुंबातील किती लोकांनी उभं रहावं याला काही मर्यादा असाव्यात असं मला वाटतं त्यामुळे मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आमची यादी अजून नक्की व्हायची आहे. यादी नक्की झाली की तुम्हाला कुठून कोण लढेल हे तुम्हाला सांगितलं जाईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Advertisement

माढा मतदारसंघातून कोण उभं राहणार याबाबत चर्चा सुरु आहे. काही सूचना माझ्याकडे आल्या आहेत. यावर कुणाचं नाव नक्की करायचं हा निर्णय घेतला जाईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मी कोणत्याही भीतीने किंवा चिंतेने माघार घेतलेली नाही.

Advertisement

आत्तापर्यंत मी एकदाही निवडणूक हरलेलो नाही. त्यामुळे या निवडणुकीलाही सामोरं जाण्यास मला आवडलं असतं. मात्र एकाच कुटुंबातल्या किती जणांनी लोकसभा लढवावी? याला मर्यादा असली पाहिजे. त्यामुळेच मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे असंही शरद पवार यांनी सांगितलं.

विजयसिंह मोहिते पाटील यांनाच माढ्यातून उमेदवारी दिली जाईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल तो तुम्हाला कळवला जाईल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मी आत्तापर्यंत चौदावेळा निवडणूक लढवली आहे एकदाही हरलेलो नाही.

त्यामुळे या निवडणुकीला घाबरून मी माघार घेतलेली नाही असंही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे असंही शरद पवार यांनी सांगितले. आता माढा मतदार संघातून कोण लढणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement