Published On : Fri, May 10th, 2024

शरद पवार दंत महाविद्यालय, सावंगी डॉ. पवन बजाज यांना फौचार्ड-यादव संशोधन पुरस्कार

Advertisement

वर्धा – दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील शरद पवार दंत महाविद्यालयातील शिक्षक डॉ. पवन बजाज यांना राष्ट्रीय स्तरावरील संघटित क्षेत्रसंलग्न मौखिक आरोग्य संशोधनासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या पियरे फौचार्ड-पद्मश्री प्रा. जी.डी. यादव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय, नागपूर येथे आयोजित पाचव्या संशोधन पुरस्कार समारंभात एक लाख अकरा हजार रुपयांचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. पवन बजाज हे सावंगीच्या दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील पेरियोडॉन्टिस्ट विभागात सहयोगी प्राध्यापक तसेच संशोधन उपअधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचे दंतचिकित्सा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रगत संशोधनाने मौखिक आरोग्यसेवेत उत्कृष्टतेचे मानदंड स्थापित केले आहेत. डॉ. बजाज यांच्या या उल्लेखनीय कार्याकरिता कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, कार्यकारी संचालक डॉ. तृप्ती श्रीवास्तव, कुलसचिव डॉ. श्वेता पिसूळकर, दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. राजीव बोरले, शरद पवार दंत महाविद्यालयाच्या संचालक मनीषा मेघे, अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे, उपअधिष्ठाता डॉ. अलका हांडे यांनी अभिनंदन केले.