Published On : Mon, Nov 23rd, 2020

शांती नगर गळती दुरुस्ती व ओंकार नगर जलकुंभ स्वच्छता यांसाठी शटडाऊन २५ नोव्हें रोजी

Advertisement

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठा देखील राहणार बंद

नागपूर: सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणाऱ्या ६०० मिमी व्यासाच्या शांती नगर फीडर लाईनवर पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ मोठी गळती उद्भवलेली आहे. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी या गळतीच्या दुरुस्तीसाठी बुधवार २५ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री १० वाजता पासून पुढे २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

या कामामुळे शांती नगर जलकुंभावरून पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

यामुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: शांती नगर, म्हाडा कॉलोनी, करुणा नगर, बागडे प्लॉट, ४० संडास, रामसुमेरबाबा नगर, साई नगर, मारवाडी वाडी, हनुमान नगर, मुदलियार लेआऊट, मस्के लेआऊट, कावडपेठ, तुलसी नगर, कश्यप कॉलोनी, महेश नगर, ई.

याचदरम्यान मनपा-OCWने हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या ओंकार नगर जलकुंभाची स्वच्छतादेखील करण्याचे काम हाती घेण्याचे ठरविले आहे.

जलकुंभ स्वच्छतेदरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: अभय नगर, कशी नगर, शताब्दी नगर, जुगल लेआऊट, चाफले लेआऊट, रहाते नगर, रामटेके नगर, राजश्री नगर, रेणुका विहार कॉलोनी, महात्मा फुले वसाहत, जोगी नगर, हरि ओम नगर, गजानन नगर, ८५ प्लॉट, रतन नगर, साकेत नगर, एकता सोसायटी, साई नगर, ओंकार नगर, श्रीहरि नगर १,२,३, विणकर कॉलोनी, स्वराज नगर, मानेवाडा जुना, दिवाण लेआऊट, स्वामी नगर, सेवादल नगर, वनराई नगर, अत्तदीप नगर, बाळकृष्ण नगर, जय गुरुदेव नगर, सेन्ट्रल रेल्वे, जयवंत नगर, भाग्यश्री नगर, सिद्धांत नगर, कपिल नगर, ई.

यादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.