Published On : Fri, May 25th, 2018

शांतनु गोयल यांनी स्वीकारला अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्त झालेले भा.प्र. सेवेतील अधिकारी शांतनु गोयल यांनी गुरूवारी (ता.२४) अतिरिक्त आय़ुक्त रवींद्र कुंभारे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला.

शांतनु गोयल हे मुळ कानपूरचे आहे. त्यांनी बीट पिलानी येथून बी.ई. ऑनर्स (इलेक्ट्रॉनिक्स) केले आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१२ तुकडीचे अधिकारी आहे. यापूर्वी शांतनु गोयल हे गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यापूर्वी राजुरा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून ही त्यांनी काम केले आहे.

अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर गोयल यांनी आज महापौर नंदा जिचकार व आयुक्त विरेंद्र सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, अभियोजन, निवडणूक, अग्निशामक व समाजकल्याण इ. विभागाचे प्रत्यायोजन आयुक्त विरेंद्र सिंह यांनी केले आहे.