नागपूर: अंबाझरीतील टिळक नगरस्थित ड्रीम फॅमिली स्पा-मसाज सेंटरमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. विवाहित महिला आणि महाविद्यालयीन तरुणींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार याठिकाणी करून घेण्यात येत होता.याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर गुन्हे शाखेने या सलूनवर छापा घालून तीन तरुणींची सुटका केली.
सलूनच्या दोन्ही मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला. निर्भय चंद्रमणी बलबिर (२०) याला पोलिसांनी अटक केली तर मालक यश किशोर कटरे (२२) आणि रवी शाहू (३५) हे दोघे फरार झाले आहेत.
तसेच देहव्यापार करणाऱ्या तीनही तरुणींना ताब्यात घेतले. त्यापैकी एक महिला विवाहित असून तिला ३ वर्षांचा मुलगा आहे.पीडित दोन मुली महाविद्यालयीन विद्यार्थीनी असून शिक्षणासाठी पैसे जमा करण्यासाठी देहव्यापारात ढकलल्या गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. तरुणींना १० ते १२ हजार रुपये पगार देऊन आरोपींनी त्यांना देह व्यवसायात ढकलले होते.