Published On : Wed, Apr 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

पावसाळयापुर्वी सांडपाणी नाल्या व मोठे नाले स्वच्छ करण्यात यावी – राजेश यादव.

Advertisement

कन्हान : – शहरातील अर्ध्या भागातील सांडपाणी प्रभाग क्र ३ च्या रेल्वे स्टेशन रोड जवळुन वाहुन नेणा-या नाली व मोठा नाला तुटुंब भरून वाहत असल्याने त्वरित सापसफाई करून स्वच्छ करित संभाव्य धोका टाळण्याकरिता पावसाळयापुर्वी कन्हान शहरातील नाल्या व मोठया नाल्याची स्वच्छ करण्यात यावी अशी मागणी मुख्याधिकारी हयाना निवेदन देऊन नगरसेवक राजेश यादव यांनी केली आहे.

नगरपरिषद कन्हान पिपरी प्रभाग क्र ३ चा नगर सेवक असुन माझ्या प्रभागातुन कन्हान शहराच्या अर्ध्या भागातील साडपाणी १) महामार्गावरील नाका नं ७ ते पोलीस स्टेशन सामोरून नदीत प्रवाहित होते . २) लोहिया ले-आऊट ते रेल्वे मालाधक्का ते स्टेशन रोड परिसरातुन कन्हान नदीत प्रवाहीत होते.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हा नाला जाम झालातर हे सांडपाणी रामनगर, लोहिया ले-आऊ ट व गणेश नगर च्या घरात शिरते.३) रेल्वे च्या तिस-या रेल्वे ट्रक मुळे या मुख्य नाल्याचे पाणी जाम होऊन स्टेशन रोड व जवळील लोकवस्तीच्या घरात शिरून रोगराईचा मोठा प्रश्न उदभवण्याचा धोका नाकारा येत नाही.

करिता या लोकवस्ती परिसरातील नाल्या व मोठा नाला आणि रेल्वे लाईन खालील नाला पावसा ळयापुर्वी युध्द स्तरावर तातडीने स्वच्छ करण्यात यावा . कारण पावसाळा लागण्यास एक महिन्या आहे. या गंभीर समस्येवर लक्ष केंदित करून तातडीने कार्यवा ही करण्याची मागणी नगरसेवक राजेश यादव हयानी नगरपरिषद मुख्याधिकारी हयाना निवेदन देऊन केली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.