| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 5th, 2019

  अनियंत्रित कारने ७ ते ८ लोकांना धड़क मारल्याने ४ गंभीर जख्मी

  कन्हान : – आठवड़ी बाजाराच्या समस्याने कन्हान येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन बाजार हाट करावा लागतो . अश्यातच पोलीस स्टेशन सलग्न मच्छी मटण मार्केट येथे (दि ४)ला सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान स्विफ्ट कार क्र एम एच ४० सी एस ११६० च्या चालकांने भर वर्दळीच्या मच़्छी मार्केट रस्त्यानी वेगाने व निष्काळजीपणे आपले वाहन चालवुन ७ ते ८ लोकांना धडक मारली यात सोहन मंगल शेंडे वय ३५ वर्ष रा.सत्रापुर, कनैया सहानी वय २३ वर्ष रा.शिवनगर कान्द्री , बंडू शंकर वाघमारे वय ४५ वर्ष रा. पिपरी व इतर यांना धडक (टक्कर) मारून जखमी केले.यात चार जण गंभीर जखमी झाले असून प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे उपचारार्थ दाखल केले .

  व इतर आपल्या परीने उपचार घेत आहेत. घटनास्थळा पासून १०० मीटर अंतरावर गाडी थांबवली. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी व नातेवाईकाने पोलीस स्टेशन गाठुन आरोपी चालक यांच्या कठोर कारवाई करावी अशी मागणी करित संताप व्यकत करित विचारपुस करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कुटुम्बियाची समजुत काढण्या ऐवजी एका पोलिस कर्मचारी यांने एक युवक नामे विक्रम नंदकिशोर बेलपाण्डे रा शिवनगर च्या कानशिलात मारल्याने जमाव आक्रामक होऊन पोलीस कर्मचा-यावर कार्यवाही करण्याची मागणी केली . पोलीस स्टेशनला वातावरण गर्म असल्याने गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याचे सांगितले .

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145