Published On : Mon, Apr 24th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर एमआयडीसीतील कटारिया अ‍ॅग्रो कंपनीला भीषण आग;

३ कामगारांचा मृत्यू
Advertisement

नागपूर : नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीतील कटारिया अ‍ॅग्रो कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

कंपनीत 20-30 कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीतून निघणाऱ्या दाट धुरामुळे आजूबाजूच्या परिसर दिसेनासे झाले आहेत. या आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती असून आगीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

Advertisement

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले. या घटनेत ३ कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी मुंबईत बैठकीला असले तरी ते सातत्याने समन्वय साधत आहेत. तहसीलदार तातडीने घटनास्थळी पोहोचत असल्याची माहिती आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.