Published On : Sat, May 26th, 2018

पुढच्या २४ तासात महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका असल्याचा इशारा दिला आहे.

मीनुकू नावाचे वादळ पुढच्या २४ तासात महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर धडकणार असून वादळाची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.