Published On : Thu, Sep 17th, 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’

Advertisement

ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या हस्ते कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार : एका मुलीच्या आयुष्यभराच्या संपूर्ण शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी

नागपूर : जगातील सर्वात मोठ्या देशाचे पंतप्रधान व जगात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडणारे व्यक्तिमत्व मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. नागपूर शहरामध्ये या सेवा सप्ताहा अंतर्गत अनेक महत्वाची कार्य केली जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा नागपूर महानगरपालिकेचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी नियमती शहराची स्वच्छता ठेवून नागपूरकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी सेवा देणा-या प्रभाग २६ येथील पाच स्वछता कर्मचा-यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे, प्रभागामधील एका गरजू विद्यार्थीच्या आयुष्यभराच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीही ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी स्वीकारली आहे.

प्रभाग २६मध्ये झालेल्या सत्कार कार्यक्रमात ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्यासह प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, सुरेश बारई, अशोक देशमुख उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवाराच्या परिभाषेच्या पलिकडे वसुधैव कुटुंबकम् या संकल्पनेच्या आधारावर स्वत:ला देशाला समर्पीत केले. राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी आयुष्यभर सेवा दिली. त्यांची सेवा आज पक्षातील प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता ते नेता आणि सामान्य नागरिकांना प्रेरीत करीत आहे. त्यांच्या सेवा कार्याचा सन्मान म्हणून आज इतरांची सेवा करून ते व्रत पुढे नेण्याचे कार्य सुरू आहे. नागपूर शहरात सर्वत्र हे कार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा कार्याच्या पावलावर पाउल ठेवित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यापासून ते नेत्यांपर्यंत आणि नागरिकांनीही या सेवाकार्याचा विडा उचलावा, असे आवाहन यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा नागपूर महानगरपालिकेचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केले.