Published On : Tue, Nov 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील हॉटेलमध्ये मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

- साखरपुड्यानंतर सहा दिवसांतच आयुष्याचा शेवट
Advertisement

Auto Draft

नागपूर : साखरपुडा झाल्यानंतर नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवणाऱ्या मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याचा हॉटेलच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे. सुहास भोयर (वय ४३) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सहा दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. लग्नाच्या तयारीत असतानाच त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचे गूढ अद्याप कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुहास माधव भोयर हे हुडकेश्वर परिसरातील महालक्ष्मीनगर येथे वास्तव्यास होते. ते ४ नोव्हेंबर रोजी सुट्टीवर नागपुरात आले होते. १५ नोव्हेंबरला त्यांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी त्यांनी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा रोडवरील हॉटेल ऑक्सा इनमध्ये खोली क्रमांक २०५ बुक केली होती.

या हॉटेलमध्ये त्यांनी आपले दोन मित्र प्रशांत चुटे आणि भूपेश टिचकुले यांच्यासोबत काही वेळ घालवला. त्यानंतर पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास दोन्ही मित्र घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुहास यांनी एका मित्राला फोन केला होता. मात्र, त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद येऊ लागल्याने मित्र आणि कुटुंबीयांची चिंता वाढली.

अखेर २१ नोव्हेंबर रोजी मित्र आणि नातेवाईक हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीने खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडल्यानंतर सुहास यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला.

Advertisement

या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. साखरपुड्यानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करण्याच्या तयारीत असलेल्या सुहास यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.