Published On : Wed, Feb 12th, 2020

विकून टाक’ मधील ‘जय -विरु’

Advertisement

विवा इनएन प्रॉडक्शन निर्मित ‘विकून टाक’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे पहिल्यांदा मराठी पदार्पण करत असल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता सगळ्यांच लागली आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला मुकुंद आणि काण्या या दोघांच्या घट्ट मैत्रीची एक झलक पाहायला मिळाली. त्या दोघांची केमेस्ट्री पाहता मराठी सिनेमासृष्टीला नवीन ‘जय- विरू’ भेटले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

तर त्यांच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील मैत्रीबद्दल विचारले असता रोहित सांगतो की, ‘जितकी आमची पडद्यावर मैत्री घट्ट दिसते. तितकीच घट्ट मैत्री आमची पडद्यामागे सुद्धा आहे. माझी आणि शिवराजची कॉलेजच्या नाटक स्पर्धांमुळे आधीपासून थोडीफार ओळख होती. परंतु कधी एकत्र काम केले नव्हते. ‘विकून टाक’ चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केले. ऑडिशनच्यावेळी समीर सरांनी आम्हाला एकत्र एक सीन करायला सांगितला आणि आमच्या दोघांची केमेस्ट्री बघून त्यांनी आम्हाला निवडले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्या दिवसानंतर आमच्या मैत्रीला सुरुवात झाली ती आतापर्यंत तशीच टिकून आहे. शुटींगदरम्यान आम्ही दोघांनी एकमेकांना खूप मदत केली आहे. कोणताही सीन करताना काही गोष्टी अडल्या तर शिवराज मला समजवायचा तर कधी शिवराजला काही अडले तर मी त्याला समजवायचो’. तर या मैत्रीबद्दल शिवराज सांगतो, ‘आम्ही दोघांनीही शूटिंग दरम्यान खूप धमालमस्ती केली आहे. सेटवर अनेकांना त्रास सुद्धा दिला. सगळ्यांची टिंगल उडवण्यात आम्ही सगळ्यात आधी असायचो. आम्ही दोघांनी मिळून आमच्या सहाय्य्क दिगदर्शकांसोबत अनेकदा प्रॅन्क केला आहे. म्हणजे त्यांनी एखादा सीन आम्हाला सांगितला की नेमके त्याच्या उलट काही तरी आम्ही करायचो आणि त्याला त्रास द्यायचो.

चित्रपटातील नायिका म्हणजेच राधा सागर हिला सुद्धा आम्ही खूप त्रास द्यायचो. ज्यावेळी तिचा मेकअप सुरु असायचा त्यावेळी मुद्द्दामून तिच्या जवळ जाऊन आम्ही तिला त्रास द्यायचो. अशा अनेक गोष्टी आम्ही शूटिंग दरम्यान केल्या आहेत. ही सगळी मज्जा मस्ती करत असताना आमच्या सर्वांचीच खूप चांगली मैत्री जमली. शूटिंग दरम्यान आमच्यात जी केमेस्ट्री तयार झाली आहे. ती पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांन इतकेच आम्ही सुद्धा उत्सुक आहोत’.

उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ या चित्रपटामध्ये शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋजुता देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी असून सिद्धेश्वर एकांबे यांची कथा आणि चारुदत्त भागवत, समीर पाटील यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.

Advertisement
Advertisement