Published On : Tue, Aug 22nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात तलाठी भरती परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम लागू , १४ सप्टेंबरपर्यंत निर्बंध !

Advertisement

नागपूर : राज्यात १७ ऑगस्टपासून तलाठी भरती परीक्षा सुरु झाली आहे. मात्र परीक्षेच्या पाहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. यावरून विद्यार्थी संतापले असल्याची माहिती आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रशासनाने कलम १४४ लागू केले आहे.

परीक्षा केंद्राच्या परिसर व सभोवतालच्या १०० मीटर परिसरात हे कलम लागू राहील. यानुसार सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, आयएसडी, बुथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर्स, ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, मोबाईल, प्रसारमाध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले.

दरम्यान प्रशासनाने दिलेल्या या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लघंन केल्यास कारवाई करण्यात येईल.गट-क संवर्गातील तलाठी भरतीसाठी १४ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.