Published On : Mon, Apr 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर; उमेदवारांच्या जातीचाही उल्लेख

Advertisement

अकोला : लोकसभा निडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये उमेदवारांच्या जातीचा देखील उल्लेख केला असून विविध जातींना प्रतिनिधित्व देण्यात आले असून ११ उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उरण्याची संधी देण्यात आली आहे.

वंचितने पाहिल्या यादीत आठ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले होते. कोल्हापूर आणि नागपूर येथे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.

Gold Rate
03 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर वंचित आघाडीने रविवारी सायंकाळी ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

या यादीत हिंगोलीमधून डॉ. बी. डी. चव्हाण, लातूर नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर राहुल गायकवाड, माढा रमेश बारसकर, सातारा मारुती जानकर, धुळे अब्दुल रहेमान, हातकणंगले दादासाहेब पाटील, रावेर संजय ब्राह्मणे, जालना प्रभाकर बकले, उत्तर मध्य मुंबई अब्दुल खान व रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून काका जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement