Advertisement
मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये, कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी महिला उमेदवाराला संधी दिल्याने चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जळगाव, हातकणंगले, कल्याण आणि पालघर या ४ मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे.
तर नुकतेच उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेले करण पवार यांना जळगावमधून लोकसभेचे तिकीट दिले आहे.