Published On : Wed, Jan 22nd, 2020

‘’शाळा हे संस्‍कार व बौद्धिक वाढीचे केन्‍द्र बिंदू’’ – राजेन्‍द्र पाठक, वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक

नागपूर: ‘‘भारत एक अखंड व स्‍वतंत्र राष्‍ट्र असून , लोकशाही शासन प्रणाली स्‍वातंत्र्, समता, बंधूता या तत्‍वावर आधारित आहे. सर्वधर्मसमभाव ही आपली संस्‍कृती तर धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र ही आपली ओळख या विचारातून एक भारत-श्रेष्‍ठ भारत ही विचारधारा निर्माण करणे ही काळाची गरज असून, आजची तरूण पिढी ही उद्याच्‍या उज्‍जव भारताचे भावी नागरिक आहे, त्‍यासाठी शाळा ही संस्‍कार व बौद्धिक वाढीचे केन्‍द्रस्‍थान आहे’’, असे मार्मिक विचार वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक राजेन्‍द्र पाडक यांनी व्‍यक्‍त केले.

सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्‍या नागपूर विभागीय लोक संपर्क ब्‍यूरोच्‍यावतीने आयोजित स्‍थानिक विमलताई तिडके विद्यालयात ‘’एक भारत-श्रेष्ठ भारत’’ या कार्यक्रमाचे उद्घाटन युवासेना जिल्‍हाप्रमुख नगरसेवक हर्षल काकडे यांच्‍या हस्‍ते झाले. याप्रसंगी नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले, वाडीचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक राजेन्‍द्र पाठक, एमआयडीसी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दत्‍तात्रय लांडगे, लोक संपर्क ब्‍यूरोच्‍या सायक निदेशक मीना जेटली, मुख्‍याध्‍यापिका साधना कोलवाडकर, संजीवनी निमखेडकर, खरे, संजय तिवारी आदि उपस्‍थित होते.

कार्यक्रमांतर्गत शाळेत रांगोळी स्‍पर्धा , प्रश्‍न मंजुषा , पथनाट्य व सांस्‍कृतिक स्‍पर्धेचे आयोजन करून विजेत्‍यांना ब्यूरोतर्फे बक्षिसे देऊन सम्‍मानित करण्‍यात आले. यावेळी तहसीलदार मोहन टिकले, नगरसेवक हर्षल काकडे, सहायक शिक्षिका अश्‍विनी फलके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास माया रामटेके, श्रावण ढबंगाळे, शीतल अवझे, किशोर गरमळे, संदीप लापकाळे, सुरेक्षा घागरे, अनिल धोटे, सुधारकर धीरडे, दिगंबर गोहणे, प्रमिला हनवते, कलावती चवरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्राचे संचालन वंदना पाटील यांनी केले तर आभार सुरेश फलके यांनी मानले.