Published On : Fri, Nov 12th, 2021

शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची उपद्रव शोध पथकाव्दारे तपासणी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ११ नोव्हेंबर) रोजी ०१ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ५०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४२ मंगल कार्यालय, २५ मंदीरे, ९ मस्जिद, ५९ शाळा व कॉलेज आणि अन्य ६ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण १४१ स्थळांची तपासणी केली.

त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.