Published On : Mon, Mar 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक जाहीर करण्यात आली आहे.राज्यात नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिषदेच्या 5 जागा रिक्त झाल्या आहेत.

या रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी 10 मार्च ते 17 मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. 18 मार्च रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 20 मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Gold Rate
01 Aug 2025
Gold 24 KT 98,100 /-
Gold 22 KT 91,200 /-
Silver/Kg ₹ - ₹- ₹1,10,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विधान परिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ –
विधान परिषदे एकूण 78 सदस्य असतात. महायुतीचे एकूण 32 सदस्य आहेत. यापैकी भाजपचे 19 सदस्य, शिवसेनेचे 6 सदस्य तर, राष्ट्रवादीचे 7 सदस्य आहेत. महाविकास आघाडीचे एकूण 17 सदस्य आहेत. शरद पवार पक्षाचे 3, काँग्रेसचे 7 तर उद्धव ठाकरे पक्षाचे 7 तर 3 अपक्ष सदस्य आहेत. विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 असली तरी विद्यमान सदस्य संख्या 52 आहे. तर 26 सदस्यांची संख्या रिक्त आहे.

दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण 78 सदस्यांपैकी 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात. 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निवडले जातात. विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीसाठी जनतेतून मतदान होत नाही.

Advertisement
Advertisement