Published On : Mon, Mar 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जिल्ह्यातील ‘एसबीएल’ स्फोट प्रकरण; मृतांच्या कुटुंबीयांना ८२ लाखांची मदत जाहीर

Advertisement

नागपूर : काटोल तालुक्यातील SBL Energy Limited या कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटानंतर मृत कामगारांच्या कुटुंबीयांसाठी मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक मृताच्या वारसांना एकूण ८२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती उच्चस्तरीय बैठकीनंतर देण्यात आली.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेत आतापर्यंत १९ कामगारांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी आहेत. त्यापैकी १३ जणांची प्रकृती गंभीर असून ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक भाजले असल्याची माहिती देण्यात आली.

Gold Rate
Mar 2nd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,67,000/-
Gold 22 KT ₹ 1,55,300/-
Silver/Kg ₹ 2,87,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मृतांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून ७५ लाख रुपये, राज्य सरकारकडून ५ लाख आणि केंद्र सरकारकडून २ लाख रुपये अशी एकत्रित ८२ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. जखमींच्या उपचारांचा खर्चही संबंधित यंत्रणांकडून उचलला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, स्फोटाची नेमकी कारणमीमांसा करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात पेसो, ‘डिश’ (डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ) तसेच कामगार आयुक्त कार्यालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात आवश्यक ती तपासणी व देखरेख करण्यात त्रुटी राहिल्या का, याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी बैठकीतून पुढे आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement