Published On : Wed, Dec 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

धारावी बचाओ,अदाणी हटाव’; नागपूर अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने !

Advertisement

नागपूर: हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून विरोधकांनी आजही सत्ताधाऱ्यांना घेरले. ‘धारावी बचाव, अदाणी हटाव’ अशा घोषणा देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरआज निदर्शने केली. तसेच आमदारांनी विधिमंडळ परिसरात मोर्चा काढून आंदोलन केले.धारावीत प्रत्येक घरी लघुउद्योग चालतो. या परिसराचे पुनर्वसन झाल्यास लघुउद्योगांचेही मोठे नुकसान होणार आहे.

इतकेच नाही तर धारावीची मालकी अदाणींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा घणाघात दानवे यांनी केला. तसेच वर्षा गायकवाड यांनी धारावीमध्ये टीडीआरचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विधानभवन परिसरात पायऱ्यांवर आजही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नारेबाजी करत परिसर दणाणून सोडला. ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘ खोके सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘ अदानीला सूट, धारावीची लूट, ‘ धारावी वाचवा, लघुउद्योग वाचवा’, ‘ अदानीला सुटली धारावीची हाव’ अशाही घोषणा विरोधकांनी दिल्या. या आंदोलनात दानवे यांच्यासह वर्षा गायकवाड, वैभव नाईक, रवींद्र वायकर व इतर आमदार सहभागी झाले होते.

Advertisement
Advertisement