Published On : Wed, Apr 17th, 2019

एसीपी दर्जाचा अधिकारी एंटीकरप्शन च्या चक्रयुव्हात अडकला , पोलिस खत्यात खळबळ….

सातारा: अँटी करप्शनच्या पथकाने साताऱ्यात एक मोठी कारवाई केली आहे. फलटणचे डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांना दीड लाखाहून अधिक लाच मागितल्याप्रकरणी अँटी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याला अँटी करप्शनने ताब्यात घेतल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

डॉ. अभिजीत पाटील हे सातारा जिल्ह्यातील फलटण येथे डिवायएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका प्रकरणात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची लाच म्हणून मागणी केल्याची तक्रार अँटी करप्शनकडे करण्यात आली होती. त्याप्रकरणी अँटी करप्शनच्या पथकाने बुधवारी रात्री त्यांना ताब्यात घेतले. राज्यात पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडत असतानाच डीवायएसपी दर्जाचा अधिकारी लाच प्रकरणी सापडला आहे. त्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान अभिजीत पाटील यांच्यासह आणखी कोणी या प्रकऱणात सहभागी आहे का? याचा तपास अँटी करप्शनकडून सुरु आहे.

Gold Rate
May 08- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,200 /-
Gold 22 KT ₹ 1,41,500 /-
Silver/Kg ₹ 2,57,700/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement