Published On : Thu, Nov 29th, 2018

साटक येथे २५२ विद्यार्थ्यांना गोवर रूबेला लसीकरण

Advertisement

कन्हान: अखिलेश हायस्कूल व जि प शाळा साटक येथे प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे विद्यार्थ्यांना गोवर व रूबेला लश टोचुन २५२ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

बुधवार दि.२८ ला प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे अखिलेश हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा साटक येथे मा सिमाताई यशवंतराव उकुंडे सरपंच ग्रा प साटक, मा सुदामजी पाटील मुख्याध्यापक, मा गजानन वांढरे उपसरपंच, मा नंदनवार मुख्याध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना गोवर, रुबेला लश टोचुन मोहिमेची थाटात सुरूवात करण्यात आली . गोवर रुबेला रोगाचे समूळ उच्चाटन करण्याकरिता ही लश अतिशय सुरक्षित असून ९ वर्ष ते १५ वर्ष वयोगटातील बालकांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन डॉ. वैशाली हिंगे यांनी केले. याप्रसंगी अखिलेश हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेतील एकूण २५२ विद्याथ्याना लस टोचुन लसीकरण करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशवीतेसाठी डॉ वैशाली हिंगे , डॉ.चरपे वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. के. साटक, श्री. डी एम बोदे, श्री सोनटक्के , नफिसा पठाण, आरोग्य सहाय्यक, आरोग्य परिचारिका, एम.पी. डब्लू सेवक, अखिलेश हायस्कुल व जि प शाळा साटकचे शिक्षक, आंगणवाडी सेविका ,आशा कार्यकर्ता व इतर सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Advertisement
Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement